Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
दोन्ही टिपरीं एक चि नाद । सगुण निर्गुण नाहीं भेद रे । कुसरी अंगें मोडितील परी । मेळविति एका छंदें रे ॥१॥ कांहींच न वजे वांयां रे । खेळिया एक चि बसवंत अवघियां रे । सम विषम तेथें होऊं च नेदी । जाणऊनि आगळिया रे ॥ध्रु.॥ संत महंत सद्धि खेळतील घाई । ते च सांभाळी माझ्या भाई रे । हात राखोन हाणिती टिपर्या । टिपरें मिळोनि जाय त्याची सोई रे ॥२॥ विताळाचें अवघें जाईल वांयां । काय ते शृंगारूनि काया रे । निवडूनि बाहेर काढिती निराळा । जो न मिळे संताचिया घाई रे ॥३॥ प्रकाराचें काज नाहीं सोडीं लाज । निःशंक होउनियां खेळें रे । नेणतीं नेणतीं च एकें पावलीं मान । विठ्ठल नामाचिया बळें रे ॥४॥ रोमांच गुढिया डोलविती अंगें । भावबळें खेळविती सोंगें रे। तुका म्हणे कंठ सद्गदित दाटे । या विठोबाच्या अंगसंगें रे ॥५॥
Tuka 192
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.