Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
जेथें देखें तेथें तुझी च पाउलें । विश्व अवघें कोंदाटलें। रूप गुण नाम अवघा मेघश्याम । वेगळें तें काय उरलें । जातां लोटांगणीं अवघी च मेदिनी । सकळ देव पाट जालें । सदा पर्वकाळ सुदिन सुवेळ । चित्त प्रेमें असे धालें ॥1॥ अवघा आह्मां तूं च जालासी देवा । संसार हेवा कामधंदा । न लगे जाणें कोठें कांहीं च करणें । मुखीं नाम ध्यान सदा ॥ध्रु.॥ वाचा बोले ते तुझे चि गुणवाद। मंत्रजप कथा स्तुति । भोजन सारूं ठायीं फल तांबोल कांहीं । पूजा नैवेद्य तुज होती । चालतां प्रदक्षणा निद्रा लोटांगण । दंडवत तुजप्रति । देखोन दृष्टी परस्परें गोष्टी । अवघ्या तुझ्या मूतिऩ॥2॥ जाल्या तीर्थरूप वावी नदी कूप । अवघें गंगाजळ जालें। महाल मंदिरें माडएा तनघरें । झोपडएा अवघीं देव देवाइलें। ऐकें कानीं त्या हरिनामध्वनी । नाना शब्द होत जाले । तुका ह्मणे या विठोबाचे दास । सदा प्रेमसुखें धाले ॥3॥
Tuka 1824
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.