Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

अवघिया चाडा कुंटित करूनि । लावीं आपुली च गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना । करूनियां देशधडी । मीतूंपणापासाव गुंतलों । मिथ्या संकल्प तो माझा तोडीं । तुझिये चरणीं माझे दोन्ही पक्ष । अवघी करुनि दाखवीं पिंडी रे रे ॥1॥ माझें साच काय केलें मृगजळ । वर्णा याती कुळ अभिमान । कुमारी भातुकें खेळती कवतुकें । काय त्यांचें साचपण ॥ध्रु.॥ वेगळाल्या भावें चित्ता तडातोडी । केलों देशधडी मायाजाळें । गोत वित्त माय बाप बहिणी सुत । बंधुवर्ग माझीं बाळें । एका एक न धरी संबंध पुरलिया । पातलिया जवळी काळें । जाणोनियां त्याग सर्वस्वें केला। सांभाळीं आपुलें जाळें ॥2॥ एकां जवळी धरी आणिकां अंतरीं । तीं काय सोयरीं नव्हतीं माझीं । एकांचे पाळण एकांसी भांडण । चाड कवणिये काजीं । अधिक असे उणें कवण कवण्या गुणें । हे माव न कळे चि तुझी । ह्मणोनि चिंतनीं राहिलों श्रीपती। तुका ह्मणे भाक माझी ॥3॥

Tuka 1751

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.