Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघें घडे नाम उच्चारितां । न वेचे मोल कांहीं लागती न सायास । तरी कां आळस करिसी झणी ॥1॥ ऐसें हे सार कां नेघेसी फुकाचें । काय तुझें वेचे मोल तया ॥ध्रु.॥ पुत्रस्नेहें शोक करी अजामेळ । तंव तो कृपाळ जवळी उभा । अनाथांच्या नाथें घातला विमानीं । नेला उचलूनि परलोका ॥2॥ अंतकाळीं गणिका पिक्षयाच्या छंदें । राम राम उच्चारिलें । तंव त्या दिनानाथा कृपा आली । त्यानें तयेसी वैकुंठा नेलें ॥3॥ अवचिता नाम आलिया हे गती । चिंतितां चित्तीं जवळी असे । तुका ह्मणे भावें स्मरा राम राम । कोण जाणे तये दशे ॥4॥
Tuka 1721
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.