Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

अवतारनामभेद गणा आदि अगाद । जयासि पार नाहीं पुढें खुंटला वाद । एक चि दंत शोभे मुख विक्राळ दोंद । ब्रह्मांडामाजि दावी अनंत हे छंद ॥1॥ जय जया गणपती ओंवािळत आरती । साजि†या सरळ भुजा फरशकमळ शोभती ॥ध्रु.॥ हे मही ठेंगणी हो तुज नृत्यनायका । भोंवरि फेर देतां असुर मदिले एकां । घातले तोडरीं हो भHजनपाळका । सहस्र नाम तुज भुिHमुिHदायका ॥2॥ सुंदर शोभला हो रूपें लोपलीं तेजें । उपमा काय देऊं असे आणिक दुजें । रविशशितारागणें जयामाजी सहजें । उदरी सामावलीं जया ब्रह्मांडबीजें ॥3॥ वणिऩता शेष लीळा तया भागलीं मुखें । पांगुळले वेद चारी कैसे राहिले सुखें । अवतार जन्मला हो लिंगनाभी या मुखें । अमूर्त मूतिऩमंत होय भHीच्या सुखें ॥4॥ विश्व हें रूप तुझें हस्त पाद मुखडें । ऐसा चि भाव देइप तया नाचतां पुढें । धूप दीप पंचारति ओंवािळन निवाडें । राखें या शरणागता तुका खेळतां लाडें ॥5॥

Tuka 1575

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.