Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
सकुमार मुखकमळ निजसारनिर्मळ । सावळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ । झळकति दिव्य तेजें दंत माज पातळ । मिरवलिं मयोरपत्रें मुगुट कुंडलें माळ ॥1॥ जय देवा जगदीश्वरा । धन्य रखुमाइऩवरा । आरती करीन काया । ओंवािळन सुंदरा । जय. ॥ध्रु.॥ गोजिरें ठाणमाण भुजा मंडित चारी । शोभति शंखचक्रगदापद्म मोहरी । हृदयीं ब्रह्मपद बाणलें शृंगारीं । गर्जति चरणीं वांकी कंठ कोकिळास्वरीं ॥2॥ घवघवित उटी अंगीं बावन चंदनांची । लल्हाट कस्तुरिचा कास पितांबरीची । कटिसूत्र वरि साजिरें प्रभा वर मोतियांची। संगीत सकळ मुद्रा पाउलें कुंकुमाचीं ॥3॥ सौभाग्यसुख सागर गुणलावण्यखाणी । लाघवी दीनवत्सळ विश्व लाविलें ध्यानीं । आश्चर्य देव करिती ॠषि राहिले मुनि । धन्य ते प्रसवली ऐसिया नंदपत्नी ॥4॥ वणिऩतां ध्यान महिमा श्रुति राहिल्या नेति । रविकोटि चंद्र तारा प्रकाशा न तुळती । उदार सुर गंभीर पूर्ण आनंदमूतिऩ । तुकयाबंधु ह्मणे स्तवूं मी काय किती ॥5॥
Tuka 1573
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.