Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

काय एकां जालें तें कां नाहीं ठावें । काय हें सांगावें काय ह्मुण ॥1॥ देखतील डोळां ऐकती कानीं । बोलिलें पुराणीं तें ही ठावें ॥ध्रु.॥ काय हें शरीर साच कीं जाणार । सकळ विचार जाणती हा ॥2॥ कां हें कळों नये आपुलें आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा ॥3॥ कां हें आवडलें िप्रयापुत्रधन । काय कामा कोण कोणा आलें ॥4॥ कां हें जन्म वांयां घातलें उत्तम । कां हे रामराम न ह्मणती ॥5॥ काय भुली यांसी पडली जाणतां । देखती मरतां आणिकांसी ॥6॥ काय करिती हे बांधलिया काळें । तुका ह्मणे बळें वज्रपाशीं ॥7॥

Tuka 1492

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.