Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
नाम ह्मणतां मोक्ष नाहीं । ऐसा उपदेश करिती कांहीं । बधिर व्हावें त्याचे ठायीं । दुष्ट वचन वाक्य तें ॥1॥ जयाचे राहिलें मानसीं । तें चि पावले तयासी । चांचपडतां मेलीं पिसीं । भलतैसीं वाचाळें ॥ध्रु.॥ नवविधीचा निषेध । जेणें मुखें करिती वाद । जन्मा आले निंद्य । शूकरयाती संसारा ॥2॥ काय सांगों वेळोवेळां । आठव नाहीं चांडाळा । नामासाठीं बाळा । क्षीरसागरीं कोंडिलें ॥3॥ आपुलिया नामासाठीं । लागे शंखासुरापाठीं। फोडोनियां पोटीं । वेद चारी काढिले ॥4॥ जगीं प्रसिद्ध हे बोली। नामें गणिका तारिली । आणिकें ही उद्धरिलीं । पातकी महादोषी ॥5॥ जे हे पवाडे गर्जती । नाम प्रल्हादाचा चित्तीं । जळतां बुडतां घातीं । राखे हातीं विषाचे ॥6॥ काय सांगों ऐशीं किती । तुका ह्मणे नामख्याती । नरकाप्रती जाती । निषेधिती तीं एकें ॥7॥
Tuka 1434
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.