Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
याति शूद्र वैश केला वेवसाव । आदि तो हा देव कुळपूज्य ॥1॥ नये बोलों परि पािळलें वचन । केलियाचा प्रश्न तुह्मीं संतीं ॥ध्रु.॥ संवसारें जालों अतिदुःखें दुखी । मायबाप सेखीं कर्मलिया ॥2॥ दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥3॥ लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देख तुटी येतां ॥4॥ देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥5॥ आरंभीं कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ॥6॥ कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें। विश्वासें आदरें करोनियां ॥7॥ गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥8॥ संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥9॥ टाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि ॥10॥ वचन मानिलें नाहीं सहुदाऩचें । समूळ प्रपंचें वीट आला ॥11॥ सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥12॥ मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥13॥ यावरि या जाली कवित्वाची स्फूतिऩ । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥14॥ निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥15॥ बुडविल्या वहएा बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ॥16॥ विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होइऩल उशीर आतां पुरे ॥17॥ आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥18॥ भHा नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥19॥ तुका ह्मणे माझें सर्व भांडवल । बोलविले पांडुरंगें ॥20॥
Tuka 1328
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.