Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

मज पाहातां हें लटिकें सकळ । कोठें मायाजाळ दावीं देवा ॥1॥ कोणाचा कोणासीं न धरे संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायींचे ठायीं ॥ध्रु.॥ काढा काढा जी मोह बुंथा जाळ । नका लावूं बळें वेड आह्मां ॥2॥ जीव शिव कां ठेवियेलीं नांवें । सत्य तुह्मां ठावें असोनियां ॥3॥ सेवेच्या अभिळासें न धरा चि विचार । आह्मां दारोदार हिंडविलें ॥4॥ आहे तैसें आतां कळलियावरी । परतें सांडा दुरी दुजेपण ॥5॥ तुका ह्मणे काय छायेचा अभिलाष। हंस पावे नाश तारागणीं ॥6॥

Tuka 1210

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.