Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥1॥ नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं ह्मणियारा । सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ध्रु.॥ जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥2॥ कर्म कुळवणी ॥ न लगे धर्मपाळी दोन्ही ॥3॥ ज्ञानपाभारी ती फणी । न लगे करावी पेरणी ॥4॥ बीज न लगे संचिताचें । पीक पिकलें ठायींचे ॥5॥ नाहीं यमाचें चोरटें । विठ्ठल पागो†याच्या नेटें ॥6॥ पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग तो पिसा ॥7॥ सराये सर्व काळ । वांयां न वजे घटिकापळ ॥8॥ प्रेम पिकलें अपार । नाहीं सांटवावया थार ॥9॥ ऐसीये जोडी जो चुकला । तुका ह्मणे धिग त्याला ॥10॥

Tuka 1142

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.