Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
पैल सांवळें तेज पुंजाळ कैसें । सिरीं तुबिऩलीं साजिरीं मोरवीसें । हरे त्यासि रे देखतां ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥1॥ जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार या गोपिका दिव्य बाळा । शोभे मध्यभागीं कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळकंठीं ॥2॥ असे यादवां श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया वंदिती कोटि तेहतीस तीन्ही । महाकाळ हे कांपती दैत्य ज्यासी । पाहा सांवळें रूप हें पापनासी ॥3॥ कसीं पाउलें साजिरीं कुंकुमाचीं। कसी वीट हे लाधली दैवांची। जया चिंतितां अिग्न हा शांति नीवे। धरा मानसीं आपला देहभाव ॥4॥ मुनी देखतां मूख हें चित्त ध्याय। देह मांडला भाव हा बापमाय। तुक्या लागलें मानसीं देवपीसें । चित्त चोरटें सांवळें रूप कैसें ॥5॥
Tuka 1107
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.