Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
तुजवाचुनी मागणें काय कोणा । महीमंडळीं विश्वव्यापकजना । जीवभावना पुरवूं कोण जाणे । तुजवांचुनी होत कां रावराणे ॥1॥ नसे मोक्षदाता तिहींमाजि लोकां । भवतारकु तूजवांचुनि एका । मनीं मानसीं चिंतितां रूपनाम । पळे पाप ताप भयें नास काम ॥2॥ हरी नाम हें साच तुझें पुराणीं । हरीहातिचें काळगर्भादियोनी । करूं मुखवाणी कैसी देशघडी । तुजवांचुनि वाणितां व्यर्थ गोडी ॥3॥ भवभंजना व्यापक लोक तिन्ही । तुज वाणितां श्रमला शेषफणी । असो भावें जीव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणीक व्यर्थ काइप ॥4॥ दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी । तुका राहिला पायिं तो राख देव। असें मागतसे तुझी चरणसेवा ॥5॥
Tuka 1104
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.