Sant Seva ParishadSant Seva ParishadSSP · sant seva

Tukaram Abhangs (Gatha)

तुकाराम गाथा

मूल श्लोकः

बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचें दुःख काय जाणे ॥1॥ तयापरी करीं पाळण हें माझें । घेउनियां ओझें सकळ भार ॥ध्रु.॥ कासया गुणदोष आणिसील मना । सर्व नारायणा अपराधी ॥2॥ सेवाहीन दीन पातकांची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥3॥ जेणें काळें पायीं अनुसरलें चित्त । निर्धार हें हित जालें ऐसें ॥4॥ तुका ह्मणे तुह्मी तारिलें बहुतां । माझी कांहीं चिंता असों दे वो ॥5॥

Tuka 1024

Audio
Translations & commentaries(0)

No translations available for this verse yet.