Tukaram Abhangs (Gatha)
तुकाराम गाथा
मूल श्लोकः
मागें शरणागत तारिले बहुत । ह्मणती दीनानाथ तुज देवा ॥1॥ पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ध्रु.॥ अढळपदीं बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागरु उपमन्ये ॥2॥ गजेंद्रपशु नाडियें जळचरें । भवसिंधुपार उतरिला ॥3॥ प्रल्हाद अग्नींत राखिला जळांत । विषाचें अमृत तुझ्या नामें ॥4॥ पांडवां संकट पडतां जडभारी । त्यांचा तू कैवारी नारायणा ॥5॥ तुका ह्मणे तूं या अनाथाचा नाथ । ऐकोनियां मात शरण आलों ॥6॥
Tuka 1017
Audio
Translations & commentaries(0)
No translations available for this verse yet.